Terna Charitable Trust > special workshop for the farmers

तेरणा पब्लिक चँरीटेबल ट्रस्ट च्यावतीने शेतकऱ्याचेे मनोबल वाढविण्यासाठी व मानसिक आधार देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील ‘आशा वर्कर्स’ व विविध सामाजिक संस्था चे प्रतिनिधी यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. औरंगाबाद येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विनय बार्हाळे व डॉ. विनायक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या शुभहस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. मा. आ. राणा जगजितसिंह पाटील व जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. माले व राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे राज्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे या वेळी उपस्थित होते.